डॉ. अजितकुमारवर सरु आज्जी ऑफस्क्रीन करतात खुपच माया, लय भारी आहे दोघांची केमिस्ट्री

By  
on  

दोन ध्रुवांवरची दोन टोकं असल्याप्रमाणे सरु आज्जी आणि डॉ. अजितकुमार यांची जोडी आहे. सरु आजीला अजितकुमार जवळच काय पण त्याचं नावसुध्दा घेतलेलं तिला चालत नाही आणि कोणी अजितकुमारबद्दल चागलं व आपुलकीने बोलायला सुरुवात केली की ती लगेचच त्यांना आपल्या स्टाईलने शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात करते.


कपाऊंडर म्हणून सरु आज्जी  सतत अजितकुमारला ती हिणवत असते. 

आता सर्वांची लाडकी देवमाणूस ही मालिका शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचलीय. लवकरच ती प्रेक्षकांचा निरोप घेईल. 

ऑनस्क्रीन जरी अजितकुमार आणि सरु आज्जीचा बिलकूल पटत नसलं तरी ऑफस्क्रीन दोघंही एकमेकांवर खुप माया करतात. 

हे फोटोच त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचे पुरावे आहेत. 


निर्दोष सुटून आलेल्या अजितकुमारला पुन्हा कशी लवकरच शिक्षा होईल याच्या प्रयत्नात सरु आज्जी आहे. 

अजितकुमारला पोलिस पुन्हा पकडणार का हे लवकरच देवमाणूस आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

 

Recommended

Loading...
Share