By  
on  

हृता दुर्गुळे म्हणतेय "कमिंग बॅक होम वाली फिलिंग"

टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयानं आणि सौंदर्याने अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने प्रेक्षकांची मनं जिंकली. फुलपाखरु या मालिकेदरम्यान तर ह्रताचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. आता पुन्हा एकदा टेलिव्हिजन विश्वात ह्रता पुनरागमन करताना दिसणारेय. 

नुकताच एका मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झालाय. या मालिकेतील ह्रताची छोटोशी झलक पाहायला मिळाली आहे. 'मन उडू उडू झालं' असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत ह्रतासोबत अभिनेता अजिंक्य राऊत झळकणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta (@hruta12)

 

या मालिकेतून ह्रता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ह्रताने या मालिकेचा प्रोमो आणि टिझर सोशल मिडीयावर शेयर केलाय. शिवाय या मालिकेतून पुन्हा एकदा घरी आल्याच्या भावना असल्याचं ह्रता म्हणतेय. म्हणजेच 'कमिंग बॅक होम वाली फिलिंग' असं तिनं म्हटलय. शिवाय या मालिकेसाठी ती प्रचंड उत्सुक असल्याचं सोशल मिडीया पोस्टमध्ये म्हणतेय. तेव्हा ह्रताच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हृता या मालिकेत एक वेगळ्या लुकमध्ये दिसतेय. तिचा प्रोमोमधील लुक पाहून फक्त मालिकेतला नायकच नाही तर तिचे चाहतेही घायाळ झाले असणार यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive