By  
on  

'ती परत आलीये' मालिकेत हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत

'ती परत आलीये' या मालिकेची सर्वत्र चर्चा आहे. या मालिकेचे धडकी भरवणारे प्रोमो सध्या लक्षवेधी ठरत आहेत. या मालिकेच्या प्रोमोंनी सगळ्यांचं लक्ष वेधलय. त्यामुळे या मालिकेत काय पाहायला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र या मालिकेतील कलाकारांची नावं समोर येत आहेत.

अभिनेते विजय कदम या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. मात्र या मालिकेतील आणखी एक महत्त्वाच्या कलाकाराचं नाव समोर आलय. हा अभिनेता आहे श्रेयस राजे. 'ती परत आलीये' या मालिकेत श्रेयस महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणारेय. श्रेयसने नुकतच सोशल मिडीयावर याविषयी माहिती दिलीय. तो लिहीतो की, "लवकरच काहीतरी नवीन आणि इंडरेस्टिंग घेऊन येतोय."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreyas Raje (@shreyas_raje)

 

तेव्हा या थरारक मालिकेत श्रेयसची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. श्रेयसने आत्तापर्यंत विविध मालिकांमध्ये काम केलय. याआधी श्रेयसने 'मोलकरीण बाई', 'जिगरबाज', 'भेटी लागी जीवा', 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकांमधून श्रेयसने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'बाबांची शाळा' या चित्रपटातही श्रेयस झळकला होता. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive