By  
on  

ऋताला पाहण्यासाठी या अभिनेत्याने केली ही गोष्ट, पाहा ‘मन उडु उडु झालं’ चा नवा प्रोमो

झी मराठी वाहिनीवर लवकरच मनोरंजनाची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. कारण लवकरच या वाहिनीवर बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विविध जॉनर आणि प्रेक्षकांचे आवडते लोकप्रिय कलाकार घेऊन ही वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 

'मन उडु उडु झालं' ही नवी मालिका देखील आत्तापासूनच लक्षवेधी ठरतेय. या मालिकेचे प्रोमो सध्या चर्चेत आले आहेत. यातच या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झालाय. अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत हे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतील. 

 

या मालिकेच्या निमित्ताने ऋता आणि अजिंक्य हे दोघं पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसतील. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोत छान गंमत पाहायला मिळतेय. नजर हटणार आणि गोड अपघात घडणार असं काहीसं पाहायला मिळतय. 'फुलपाखरु' या मालिकेतून ऋताने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'दादा एक गुड न्यूज' आहे या नाटकातूनही तिला चांगला प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे तिच्या 'अनन्या' या सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत. 

'विठू माऊली' या मालिकेतून अभिनेता अजिंक्य लोकप्रिय ठरला. त्यानंतर 'मन उडु उडु झालं' या मालिकेतून अजिंक्य हटके भूमिका साकारताना दिसणारेय. येत्या 30 ऑगस्टपासून ही मालिका प्रसारित होणार आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive