By  
on  

"ती परत आलीये..." मधील हा थरकाप उडवणारा चेहरा पाहिलात का ?

'ती परत आलीये' या आगामी मालिकेची चर्चा सर्वत्र चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे ती म्हणजे नक्की कोण आहे? तिची झलक नुकतीच झी मराठीवर मालिकेच्या नवीन प्रोमो मधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. एक चित्तथरारक चेहरा आणि त्यामागे अंगावर भीतीने काटा आणणारं बॅकग्राउंड म्युजिक असलेला हा प्रोमो पाहून अनेकांची झोप उडाली असेल यात शंका नाही.

 रात्री हा प्रोमो प्रसारित झाला आणि या प्रोमो नंतर एकच खळबळ उडाली की ती नक्की कोण आहे? हा भयानक चेहरा आहे कि मुखवटा? ती परत आलीये असं विजय कदम आधीच्या प्रोमो मध्ये म्हणतात. मात्र आता तिची झलक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. ती कोण आहे याबद्दल बोलताना विजय कदम सांगतात की, "तिचा हा भयावह चेहरा मालिकेत देखील प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ती कोण आहे हे मला माहितीय पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल."

विजय कदम व्यतिरिक्त या मालिकेतील कलाकारांची फौज कोण आहे याची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलीय. येत्या 16 ऑगस्टपासून ती कोण आणि ही मालिका नेमकी काय आहे याचा उलगडा होणार आहे.  

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive