By  
on  

पाहा Photo :ऑनस्क्रिन शत्रू ऑफस्क्रिन आहेत मैत्रिणी, 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या कलाकारांची अशी आहे मैत्री

'रंग माझा वेगळा' या मालिकेतील विविध वळणामुळे ही मालिका लोकप्रिय ठरतेय. आपली चुलत बहीण दीपाचा द्वेष करणारी श्वेता ही दीपाच्या आयुष्यात विविध अडथळे निर्माण करते. श्वेतामुळे दीपाला विविध अडचणींना सामोर जावं लागतं. ऑनस्क्रिन दीपा आणि श्वेताच्या नात्यात तणाव असला तरी ऑफस्क्रिन मात्र दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत.

अभिनेत्री अनघा भगरे ही या मालिकेत श्वेताची भूमिका साकारतेय. तर अभिनेत्री रेश्मा शिंदे दीपाच्या भूमिकेत दिसते. श्वेता आणि दीपा साकारणाऱ्या अनघा आणि श्वेताची ऑफस्क्रिन चांगली बाँडिंग आहे. अनघाने सोशल मिडीयावर नुकतेच काही खास फोटो शेयर केले आहेत. 

या फोटोंमध्ये दीपासोबतच इतर भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसोबतही श्वेताने फोटो शेयर केले आहेत. श्वेताच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्णिमा तळवळकरसोबतचा फोटोही तिने शेयर केलाय. या फोटोंना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. 

ऑनस्क्रिन विविध भूमिका साकारणाऱ्या या कलाकारांची ऑफस्क्रिन चांगलीच मैत्री असल्याचं पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive