महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी काम करणाऱ्या दीपस्तंभ संस्थेचे संस्थापक आहेत प्राध्यापक यजुवेंद्र महाजन.
कोण होणार करोडपतीच्या कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात.
दिव्यांग-अंध मुलांना आपल्या दीपस्तंभ संस्थेने यजुवेंद्र सरांनी आशेचे पंख दिले आहेत आणि या मुलांसाठी आणि दीपस्तंभ संस्थेसाठी कोण होणार करोडपतीच्या कर्मवीर विशेष भागात प्रोफेसर यजुवेंद्र महाजन येणार आहेत.
जीवन किती सुंदर आहे आणि प्रत्येकानी ते कस भरभरून जागायला हवं असं त्यांनी यावेळी सांगितलं. स्वतःच राहत घर विकून त्यांनी ही संस्था सुरु केली आणि आपल्या एका घरामुळे जर २०० घरं चालणार असतील तर आपलं घर विकण्याचा सौदा वाईट नाही असा धाडसी विचार करणारे यजुवेंद्र महाजन यांनी अनेक किस्से आणि गोष्टी मंचावर सांगितल्या.
प्पाहा, कोण होणार करोडपती - कर्मवीर विशेष! २१ ऑगस्ट, शनिवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.