By  
on  

पाहा Video : 'अजूनही बरसात आहे' मालिकेच्या सेटवर उमेश - प्रियाची धमाल मस्ती

सोशल मिडीयावर काय व्हायरल होईल आणि काय ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. कधी एखादा व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी एखादी डान्स स्टेप ट्रेंड होऊ लागते. अशीच एक डान्स स्टेप्स सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. सोशल मिडीयावर अनेक जण ही डान्स स्टेप असणारे व्हिडीओ करतेय.

मनोरंजन विश्वातील कलाकार अशा ट्रेंडपासून चूकत नाही. कोणताही नवा ट्रेंड आला की सेलिब्रिटी तो ट्रेंड फॉलो करताना दिसतात. विविध मालिकांच्या सेटवर हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात फॉलो केला जातोय. 'अजूनही बरसात आहे' या मालिकेच्या सेटवरही कलाकारांनी हा ट्रेंड फॉलो केलाय.

अभिनेता उमेश कामत आणि मुक्ता बर्वे या प्रमुख कलाकारांसह इतर कलाकारही या व्हिडीओत ही स्टेप्स करताना दिसत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

या मालिकेच्या निमित्ताने उमेश आणि मुक्ता मोठ्या कालावधीनंतर मालिकाविश्वात काम करताना दिसत आहेत. शिवाय उमेश आणि मुक्ताही जोडी बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करताना दिसतेय. या मालिकेतील दोघांची केमिस्ट्री पसंत केली जात आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive