By  
on  

"मला एकत्र कुटुंबपद्धती खूप आवडते", आगामी मालिकेविषयी अमृता पवारने सांगितली ही गोष्ट

एक मुलगी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये लग्न करून गेल्यावर तिची होणारी तारेवरची कसरत ही सध्या झी मराठी वरील आगामी मालिका 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' च्या प्रोमोजमधून दिसतय. या मालिकेत अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिका साकारतायत.  

या मालिकेत अमृता ही अदितीची भूमिका साकारतेय. जी मोठ्या श्रीमंत घरातील मुलगी आहे जिला गर्दीची, खूप माणसांची भिती वाटत असते. तिचं अशा एका मुलावर प्रेम आहे जो एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये वाढला आहे. त्याच कुटुंब खूप मोठं आहे हे जेव्हा तिला कळेल तेव्हा काय घडेल हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल. या मालिकेतील भूमिकेसाठी विचारणा झाल्यावर अमृता खूप उत्सुक असल्याचं सांगते. ती म्हणते की, "या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा मी खूप जास्त एक्सायटेड होती. कारण ही भूमिका मी आधी निभावलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या भूमिकेबद्दल जेव्हा मला सविस्तर सांगण्यात आलं तेव्हा ते ऐकून मला जितकं छान वाटलं तितकंच मला शूटिंग करताना देखील मजा येतेय. माझी खात्री आहे कि प्रेक्षकांना देखील माझी भूमिका खूप आपलीशी वाटेल."

या भूमिकेविषयी ती सांगते की, " अदितीला माणसांची भीती वाटते त्यामुळे ती एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये किती रुळेल हे सांगता येत नाही पण याउलट मला स्वतः एकत्र कुटुंब पद्धत खूप आवडते. मी खूप एन्जॉय करते, मला सर्व कुटुंबियांसोबत वेळ घालवायला, त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतं. हा एक फरक आहे अदिती आणि अमृता मध्ये. त्याचबरोबर दोघींमध्ये साम्य असं आहे कि दोघी कि जर कोणाला आपलं मानतात तर त्या व्यक्तीला त्या खूप जीव लावतात."

या मालिकेचे प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर अमृताला यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळत आहेत. ती म्हणते की, "प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद मिळतोय. मालिकेचे प्रोमोज खूप उत्तम पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचले त्यामुळे मालिकेबद्दलची उत्सुकता त्यांच्यामध्ये वाढली आहे. प्रोमोज पाहिल्यानंतर मालिकेमध्ये अजून किती मजा आणि धमाल पाहायला मिळणार याची आतुरता प्रेक्षकांना आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय आणि मालिका सुरु झाल्यावर देखील ते असंच भरभरून आमच्यावर प्रेम करतील अशी मला आशा आहे."

सध्या या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून मालिकेच्या सेटवरील काही गोष्टी तिने शेयर केल्या आहेत. ती सांगते की, "प्रोमोज बघून प्रेक्षकांना कळलंच असेल कि किती मोठी फॅमिली आहे मालिकेत. आमचं आता हे कुटुंबच आहे. त्यामुळे तितकीच धमाल मस्ती देखील चालू असते. वेळ कसा निघून जातो हे कळत देखील नाही. आमच्या जेवण्याच्या वेळा देखील एकच आहेत, आम्ही एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतो. जसं मी आधी म्हंटल कि मी गणपती या सणाची वाट बघायची कारण त्यावेळी सगळं कुटुंब एकत्र यायचं. तो काळ या मालिकेमुळे माझ्या आयुष्यात परत आला आहे असं मला वाटतं कारण इथे देखील मला हे एक मोठं कुटुंब भेटलं आहे जे माझ्या खूप जवळचं आणि आपलंस आहे."

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive