By  
on  

'कोण होणार करोडपती' च्या कर्मवीर विशेष भागात लेफ्टनंट कनिका राणे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची हजेरी

मेजर कौस्तुभ राणे यांनी देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. याच कौत्सुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे ह्या त्यांचं देशसेवेचं व्रत पुढे नेत आहेत. म्हणूनच त्या स्वत: सैन्यात भरती झाल्यात. नोव्हेंबर 2020 मध्ये कनिका या आर्मीमध्ये रुजू झाल्या. आता कनिका यांनी पतिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत शिवाय त्यांना वीर पत्नीसांठी काम करायचं आहे. 

नुकतच 'कोण होणार करोडपती' च्या कर्मवरी विशेष भागात बॅटल कॅज्युअल वेल्फेअर फंड या संस्थेसाठी त्या खेळायला आल्या होत्या. या खेळात त्यांना साथ देणारेय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. अनेक हिंदी - मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री सोनाली या निमित्ताने या मंचावर दिसणार आहे. सोनाली आणि लेफ्टनंट कनिका दोघं मिळून हा ज्ञानाचा खेळ खेळणार आहे.

 

 

यावेळी कनिका यांनी मंचावर कौस्तुभ यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय कसा घेतला हे देखील सांगितलं. कनिका यांनी यावेळी परिधान केलेल्या कोटला एक पीन देखील लावली होती. सचिन खेडेकरांनी विचारल्यावर ती मेजर कौस्तु यांची पीन असून त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ती लावली असल्याचं त्यांनी सांगितलय. या मंचावर जिंकलेले पैसे लेफ्टनंट कनिका राणे आणि सोनाली कुलकर्णी या बॅटल कॅज्युअल वेल्फेअर फंड या संस्थेला दान करणार आहेत. हा कर्मवीर विशेष भाग येत्या 28 ऑगस्टला सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive