एखादी नवी मालिका प्रदर्शित होत असेल तेव्हा त्या मालिकेविषयी अनेक चर्चा रंगतात. अशीच चर्चा रंगलीय एका मालिकेची. ही मालिक आहे 'मन झालं बाजिंद'. मालिकेच्या शीर्षकानेच सगळ्यांंचं लक्ष वेधलय. मालिकेचं हटके नाव चर्चेचा विषय ठरतय. इतकं की अनेकांनी गुगलवर या नावाचा अर्थ मोठ्या प्रमाणात शोधला होता.
या मालिकेच शीर्षक गीतही आता लक्ष वेधून घेत आहे. याचं शीर्षक गीताच्या चित्रीकरणाचा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंटवर हा व्हिडीओ शेयर करण्यात आलाय. यावेळी चित्रीकरण दरम्यान पडद्यामागे घडलेल्या काही गोष्टी पाहायला मिळतायत.
नेहमी प्रेमाचा रंग गुलाबी असं म्हटलं जातं पण या मालिकेतून चक्क प्रेमाचा पिवळा रंग पाहायला मिळतोय. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे. मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी ही कृष्णा आपली मुख्य नायिका आहे. यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर खुलणार आहे. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून एकत्र दिसत आहेत.