By  
on  

पाहा Video : मुक्ता बर्वेनेही फॉलो केला हा ट्रेंड, मालिकेच्या सेटवरच केला व्हिडीओ

'अजूनही बरसात' आहे या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत बऱ्याच वर्षांनी या मालिकेच्या निमित्ताने टेलिव्हिजनवर झळकताय. एक वेगळी प्रेम कहाणी या मालिकेत पाहायला मिळतेय. शिवाय मुक्ता आणि उमेश ही जोडी बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसत असून या जोडीला पसंती मिळत आहे. 

मात्र चित्रीकरण व्यतिरिक्त मालिकेच्या सेटवर कलाकार मंडळी विविध ट्रेंड फॉलो करताना दिसतायत. कधी सेटवरील फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला जातो तर कधी संपूर्ण कास्ट एकत्र येऊन धमाल व्हिडीओ करते. नुकताच अभिनेत्री मुक्ता बर्वेने केलेला व्हिडीओ लक्षवेधी ठरलाय. या व्हिडीओत मुक्तासोबत पूर्वा कौशिक आणि अभिनेत्री सुहिता थत्ते देखील दिसत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

 

सोशल मिडीयावर एक डान्स ट्रेंड या तिघींनी फॉलो केलाय. मुक्ता बर्वेचा असा अंदाज पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. शिवाय हा व्हिडीओही पसंत केला जातोय. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केलाय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive