‘मन उडु उडु झालं’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या मालिकेत झळकणारे कलाकार. अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकताय. हे लोकप्रिय कलाकार या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकताय.
मालिकेचे प्रोमो आत्तापासूनच लक्षवेधी ठरलेत. यात मालिकेचं शीर्षक गीतही नुकतच प्रदर्शित करण्यात आलय. या गाण्यात या मालिकेत मुख्य पात्र साकारणारे ऋता आणि अजिंक्यचा धमाल डान्स पाहायला मिळतोय.
मालिकेच्या प्रोमो आणि शीर्षक गीतामधील दोघांची केमिस्ट्री चांगलीच लक्षवेधी ठरतेय. तेव्हा या मालिकेतील ऋता आणि अजिंक्यची केमिस्ट्री पाहणं महत्त्वाचं ठरणारेय. येत्या 30 ऑगस्टपासून ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय.