By  
on  

पाहा Video : 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ?' मालिकेचं शीर्षक गीत, दिसतायत प्रेमामध्ये गुंतलेले दोन जीव

 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ?' या आगामी मालिकेचं नावच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतय. सासरी आलेली मुलगी एका एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कशी वावरते आणि कसा संसार करते ही या मालिकेची खरी गंमत आहे. या मालिकेच्या विविध प्रोमोनंतर आता मालिकेचं शीर्षक गीत पाहायला मिळतय.

या शीर्षक गीतात या मालिकेतील सर्व कलाकार पाहायला मिळतायत. अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अमृता पवार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकतायत. मालिकेच्या शीर्षक गीतात हार्दिक आणि अमृताची केमिस्ट्री लक्षवेधी ठरतेय. 

 

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून राणादा म्हणून लोकप्रिय ठरलेला अभिनेता हार्दिक जोशी या मालिकेतून एका वेगळ्या भूमिकेतून झळकणार आहे. तर 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेत जिजाऊंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता पवार या मालिकेत हटके भूमिकेत झळकणारेय. तेव्हा 30 ऑगस्ट पासून झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ही मालिका पाहणं लक्षवेधी ठरणारेय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive