'मन उडू उडू झालं'च्या शीर्षक गीतावर मुंबईच्या रिक्षा चालकांनी असा धरला ताल  

By  
on  

'मन उडू उडू झालं' ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्यापूर्वीच मालिका चांगलीच चर्चेत आली होती. अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत ही जोडी मोठ्या प्रमाणात पसंत केली जात आहे. यातच मालिकेचं शीर्षक गीत सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या गाण्यावर विविध व्हिडीओ केले जात आहेत. 

 इंद्रा आणि दिपूच्या जोडीवर आणि या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. अवधूत गुप्ते आणि आर्या आंबेकर यांनी गायलेलं आणि सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडतय. इतकंच नव्हे तर ‘मन उडु उडु झालं’च्या उडत्या चालीवर मुंबईच्या रिक्षावाल्यांनाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.

रिक्षा चालकांनी हॉर्न वाजवून या मालिकेचं शीर्षक गीत हटके पद्धतिने वाजवण्यात आलय.

 

या गाण्याच्या धूनवर रिक्षा चालकांनी तयार केलेला माहोल सध्या एका व्हिडीओतून व्हायरल होतोय. हा व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यातून मालिकेवर प्रेक्षकांचं असलेलं प्रेम झळकतय. या व्हिडीओवर देखील नेटिझन्स आपल्या प्रतिक्रियांमधून मालिका आणि त्याच्या शीर्षकगीतावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून अल्पावधीतच मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठल्याचं पाहायला मिळतय.

Recommended

Loading...
Share