By  
on  

ही मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप, सिद्धार्थ चांदेकर म्हणतो "आयुष्यभर लक्षात राहील असा प्रवास"

सांग तू आहेस का मालिकेच्या प्रोमोपासूनच ही मालिका लक्षवेधी ठरली होती. एक वेगळी कहाणी थरारक स्वरुपात मांडून या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. स्वराज आणि त्याची मृत पावलेली पत्नि वैदेही जिचा आत्मा त्याच्या आसपास वावरतो आणि तिच्या मृत्यूच सत्य ती कशी समोर आणते हे या मालिकेत पाहायला मिळतय. 

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी या कलाकारांच्या या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका दिसल्या. नुकत्याच या मालिकेच्या शेवटच्या भागासाठी कलाकारांनी चित्रीकरण केलय. कारण ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेतेय. 

सोशल मिडीयावर या कलाकारांनी भावुक पोस्ट करून मालिकेच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाचे फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही सेटवरील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासोबतचा फोटो शेयर केलाय. सिद्धार्थ या पोस्टमध्ये लिहीतो की, "आज शूटिंगचा शेवटचा दिवस! आयुष्यभर लक्षात राहील असा प्रवास. स्टार प्रवाह आणि आयरीश प्रॉडक्शनचे जितके आभार मानावे तितके कमीच. आणि सगळ्यात जास्त तुमचे आभार. तुम्ही भरभरून प्रेम दिलंत म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो. लवकरच आणखी काहीतरी नवीन घेऊन येईन. तुमच्यासाठी."

तेव्हा सिद्धार्थचे चाहते मात्र त्याच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive