By  
on  

'ती परत आलीये' मालिकेत लवकरच होणार 'ती'चा पर्दाफाश

सध्या विविध वाहिन्यांवर विविध विषय, जॉनर असलेल्या मालिका आणि कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. यात अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यापैकी एक मालिका म्हणजे ती परत आलीये. या मालिकेतील आगळा वेगळा थरार हा रंजक ठरतोय. यातच या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

 प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा पाहता या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेचं रहस्यमय कथानक आणि खिळवून ठेवणारे प्रसंग यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. नुकताच या मालिकेने 100 यशस्वी भागांचा टप्पा पार केलाय. यासोबतच ही मालिका शेवटच्या आणि अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. 


मालिकेच्या सुरुवातीपासूनच ती परत आलीये म्हणजे ती नक्की कोण आहे? या प्रश्नाने प्रेक्षकांना भंडावून सोडले. आता लवकरच मालिकेत 'ती'चा पर्दाफाश होणार असून या सगळ्यामागे नक्की कोण आहे हे प्रेक्षकांना कळेल. एकामागे एक चालू असलेल्या हत्येच्या मालिकेमागे नक्की ती आहे की तो याच रहस्य उलगडणार असून संपूर्ण महाराष्ट्राला 'ती' कोण आहे? याच उत्तर मिळणार आहे.

त्यामुळे लवकरच हे रहस्य या मालिकेच्या पुढील भागांमध्ये समोर येईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive