By  
on  

'किचन कल्लाकार'च्या मंचावर रंगली अनोखी संगीत खुर्ची

'किचन कल्लाकार' हा एक आगळा वेगळा कुकिंग शो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या कार्यक्रमाच्या नावाप्रमाणे हा कार्यक्रमही तितकाच हटके आहे. या कार्यक्रमात अनेक दिग्गज, नामवंत व्यक्तिमत्त्व हजेरी लावताना दिसणार आहेत. यातच आगामी भागात काही राजकारणी नेतेमंडळी पाहायला मिळती.


या कार्यक्रमाच्या आगामी भागात पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे या नेते मंडळींनी सेटवर हजेरी लावली. यात महाराज म्हणजेच प्रशांत दामले यांनी या तिन्ही नेत्यांना महाराजांच्या आवडीचे पदार्थ करायचं आव्हान दिलं. 

विसरलेले पदार्थ पेठेतून आणण्यासाठी काही ठिकाणी युती तर काहीवेळा खुर्चीसाठी सामना करावा लागणार आहे. या भागात विसरलेलं सामान मिळवण्यासाठी एक अनोखा संगीतखुर्चीचा सामना देखील रंगताना दिसेल. तिघांनीही या विशेष भागात धमाल किस्से सांगितले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive