By  
on  

मालिकाविश्वातील लोकप्रिय भूमिका दौलत आणि शेफालीमध्ये आहे खास कौटुंबिक नातं

'सुंदरा मनामध्ये भरली', 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहेत. या मालिकांमधील विविध भूमिकाही लोकप्रिय ठरल्या आहेत. 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील दौलत हा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो तर 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील शेफालीची भूमिकाही लक्षवेधी ठरतेय. ही दोन्ही पात्र साकारणाऱ्या कलाकारांचं मात्र एकमेकांसोबत खास नात असल्याचं समोर आलय.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत अभिनेत्री काजल काटे ही शेफालीची भूमिका साकारतेय. तर अभिनेता ह्रषिकेश शेलार हा दौलतची भूमिका साकारतोय. मात्र काजल आणि ह्रषिकेश हे खऱ्या आयुष्यात एकमेकांना ओळखतात. दोघांचं कौटुंबिक नातं असल्याचं आता समोर आलय.

ह्रषिकेशची पत्नी स्नेहा ही देखील अभिनेत्री आहे. तर काजल काटे ही स्नेहाची सख्खी बहीण आहे. काजल ही स्नेहाची धाकटी बहीण आहे. त्यामुळे काजल ही ह्रषिकेशची मेहुणी आहे. त्यामुळे या नात्याची आता सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive