By  
on  

'हे तर काहीच नाय' कार्यक्रमाच्या आगामी भागात ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या शेवटच्या आठवणी

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. रमेश देव यांच्या जाण्यानं मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. मात्र वयाच्या 94 व्या वर्षापर्यंत रमेश देव हे शेवटपर्यंत काम करत राहिले. त्यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वी हे तर काहीच नाही या कार्यक्रमात रमेश देव यांनी हजेरी लावली होती. 

रमेश देव यांच्या उपस्थितीने सगळेच कलाकार भारावून गेले होते. यावेळी रमेश देव यांनी त्यांच्या करियरमधील अनेक किस्से शेयर केले होते. अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला होता. त्यांचे किस्से ऐकून सगळ्या उपस्थित कलाकारांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

वयाच्या 94 व्या वर्षी देखील रमेश देव यांचा असलेला उत्साह या कार्यक्रमातही पाहायला मिळाला. त्यांच्या या काही गोड आठवणी त्यांच्याचकडून ऐकण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. 'हे तर काहीच नाही' या कार्यक्रमाच्या आगामी भागात रमेश देव यांचा खास भाग पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रमेश देव यांच्या शेवटच्या आठवणी या कार्यक्रमातून पाहता येणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive