जयदीप बनला बाजीगर, या कारणासाठी जयदीपची बाजीगरच्या शाहरुखशी तुलना...

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. यातच या मालिकेला आता अनपेक्षित वळण मिळणार आहे. जयदीप गौरीचा कडेलोट करताना दिसला. त्यानंतर तो आणि मानसी घरी येऊन सर्वांना गौरीला शोधूनही ती सापडली नसल्याचं खोटं सांगतात. या ट्विस्टमुळे मालिकेत नवा ड्रामा पाहायला मिळतो. यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय.

या मालिकेत जयदीपची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार जाधवने सोशल मिडीयावर एक लक्षवेधी पोस्ट शेयर केलीय. या मालिकेतील जयदीप आणि बाजीगरमधील शाहरुखचं खास कनेक्शन या पोस्टमध्ये पाहायला मिळतय. मंदारने नुकतीच एक पोस्ट शेयर केली आहे. यात मंदारने जयदीपच्या भूमिकेतील फोटो शेयर केला आहे. मात्र या पोस्टचं कॅप्शन लक्ष वेधून घेतय. मंदारने या कॅप्शनमध्ये लिहीलय की, "बाज़ीगर मैं बाज़ीगरदिलवालों का मैं दिलबर"

 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील नव्या प्रोमोमध्ये जयदीप चक्क गौरीला टेकडीवरुन ढकलून देत असल्याचं पाहायला मिळतय. मालिकेतील हा नवा ट्विस्ट थक्क करणारा आहे. जयदीपचं हे नवं रुप पाहुन प्रेक्षकांना धक्का बसणार एवढं नक्की. त्यामुळे जयदीप हा बाजीगरच्या शाहरुखप्रमाणे वागत असल्याचं दिसतय. म्हणूनच जयदीपची बाजीगरसोबत तुलना होत आहे. आगामी काळात या मालिकेत आणखी काय पाहायला मिळेल ? जयदीपचं हे नवं सत्य आहे तरी काय ? जयदीप का बदलला ? याची उत्तर या मालिकेतून पुढील काळात मिळतीलच.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

Recommended

Loading...
Share