'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल यांची हजेरी

By  
on  

'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने महाराष्ट्राच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय.  'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' हे ब्रीदवाक्य असलेला हा स्वप्नपूर्तीचा मंच एकापेक्षाएक रत्न घडवताना दिसतोय. अखेरीस महाराष्ट्राला आता टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. अंतिम फेरीसाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. यंदाच्या आठवड्यात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांनी हजेरी लावली होती. 

लक्ष्मीकांत-प्यारेलाल ही एक सुप्रसिद्ध बॉलीवूड संगीतकार जोडी होती. अनेक हिंदी चित्रपटांना यांनी संगीत दिले आहे. या जोडीतले प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यंदाच्या आठवड्यात सुरांच्या मंचावर आले होते. ते स्पर्धकांना मार्गदर्शन करणार दिसतील. यंदाचा आठवडा खरंच खास असणार आहे. लक्ष्मीकांत- प्यारेलाल या लोकप्रिय जोडीने संगीतबद्ध केलेली गाणी स्पर्धक सादर करणार आहेत. प्यारेलाल सुरांच्या मंचावर किश्शांचा आणि आठवणींचा पेटारा उघडणार आहेत. त्यांचा अनुभव ते या नवीन पिढीबरोबर शेअर करणार आहेत. 

लवकरच हा खास भाग इंडियन आयडल मराठीच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. 

Recommended

Loading...
Share