'रात्रीस खेळ चाले' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली. अण्णा नाईक, शेवंता आणि या मालिकेतील विविध पात्र लोकप्रिय झाली. पहिल्या यशस्वी भागानंतर या मालिकेचे आणखी दोन भाग आले. दुसऱ्या भागानंत तिसऱ्या भागातही अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले.
मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात येणार आहे. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अत्रुप्त आत्म्यांनी नाईकांच्या वाड्याचा ताबा घेतला. मात्र या सगळ्या अण्णा नाईकांची पत्नी या सगळ्या अडचणींना सामोरं जाते आणि शेवटपर्यंत लढा देते.
शेवटच्या भागात नाईक कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आनंदाने राहताना दिसणार आहेत.
'रात्रीस खेळ चाले 3' मालिकेसह 'घेतला वसा टाकू नको' हा कार्यक्रमदेखील प्रेक्षकांचा निरोप घेईल. 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रमाच्या जागी आदेश बांदेकरांचा महामिनिस्टर कार्यक्रम येत्या 11 एप्रिलपासून सुरु होणार आहे.