'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत वीणा जगताप साकारतेय रेवा

By  
on  

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आणि आता ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत नुकतीच रेवा दीक्षित ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि ही भूमिका साकारणारा चेहरा हा प्रेक्षकांच्या ओळखीचा आहे. रेवाच्या भूमिकेत या मालिकेत अभिनेत्री वीणा जगतापची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय.


रेवा ही एक फायनान्सर आहे आणि ती देशमुख परिवारातील सीड आणि अदितीमध्ये बिझनेसच कौशल्य हेरून त्यांच्या बिझनेसला फायनान्स करायचं कि नाही हा निर्णय घेणार आहे. पण प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की अदितीने रेवाचा अपमान केल्यामुळे रेवाला राग येतो. आता मालिकेत पुढे असं घडणार आहे कि रेवा सिद्धार्थला फायनान्स द्यायचं ठरवते. सिद्धार्थ आणि रेवा मधील मैत्रीचा आपण चुकीचा अर्थ घेतला याचं अदितीला वाईट वाटतं. ती रेवाची माफी मागते आणि स्वतःला बायको आणि बिझनेस वुमन म्हणून सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागते. सगळं देशमुख कुटुंब अदितीच्या पाठीशी उभे रहातात. आता सिद्धार्थची अस्वस्थता वाढते. रेवा फायनान्स देणार आहे ही संधी त्याच्या हातातून निघून जाते की काय अशी त्याला भिती वाटते. रेवा नक्की कोणाला फायनान्स देणार हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल.

रेवाच्या भूमिकेबद्दल बोलताना वीणा म्हणाली, "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या लोकप्रिय  मालिकेत मी रेवाची महत्वपूर्ण भूमिका निभावतेय आणि रेवाने अशा एका विलक्षण वळणावर मालिकेत एंट्री घेतली आहे त्यामुळे मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे याचा मला खूप आनंद आहे. रेवाची एंट्री मालिकेत झाल्यापासून मला प्रेक्षकांकडून भरगोस प्रतिक्रिया आणि त्यांचं प्रेम मिळतंय. प्रेक्षकांना रेवाला पाहायला आवडतंय हीच माझ्या कामाची पावती आहे. रेवा आता पुढे काय काय करणार? कोणाला फायनान्स देणार? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल."

Recommended

Loading...
Share