PeepingMoon: ललित, सई आणि पर्ण यांचा लव्ह ट्रँगल असलेला 'मिडीयम स्पायसी'चा ट्रेलर प्रदर्शित!

By  
on  

मोहित टाकळकर दिग्दर्शित 'मिडीयम स्पायसी' नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

'पेटपुराण' या वेबसिरीज मध्ये एकत्र दिसलेली सई आणि ललित जोडी या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात आणखी एक गोड तडका म्हणून अभिनेत्री पर्ण पेठे ही देखील आहे. 'पेटपुराण' मध्ये शेफची भूमिका केल्यानंतर 'मिडीयम स्पायसी' मधून ललित प्रभाकर पुन्हा एकदा शेफच्या भूमिकेत दिसणार आहे.

ललित साकारत असलेल्या शेफ निस्सीमच्या आयुष्यातील नात्यांची चॉईस जास्त असल्याने त्याचं आयुष्य कॉम्प्लिकेटेड झालं आहे. अश्या गोंधळलेल्या मनस्थितीत वावरणाऱ्या एका शेफच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला असल्याचे दिसून येत आहे.

तसेच साऊथ इंडियन भाषेचा टोन बोलणाऱ्या गौरीची भूमिका अभिनेत्री सई ताम्हणकरने साकारली आहे. याआधी 'पोंडेचेरी' या सिनेमात साऊथ बाज असलेल्या मराठी मुलीची भूमिका सईने साकारली होती. त्यामुळे 'मिडीयम स्पायसी' सिनेमातून सई पुन्हा एकदा एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर स्वतःच्या पायावर ठाम उभी असलेली प्राजक्ता अभिनेत्री पर्ण पेठे साकारत आहे. 'अश्लील उद्योग मित्र मंडळ' या सिनेमानंतर दोन वर्षांनी पर्ण पुन्हा या सिनेमातून दिसणार आहे. याच सिनेमात सई आणि पर्ण दोघी होत्या आणि 'मिडीयम स्पायसी' द्वारे त्या पुन्हा एकत्र दिसणार आहेत. ट्रेलर वरून सई, ललित आणि पर्ण यांचा लव्ह ट्रँगल या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 

Recommended

Loading...
Share