बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर आज त्याच्या वयाच्या पन्नाशीत पदार्पण करत आहे. याच सोबत करणने निर्मिती केलेल्या त्याच्या पहिल्या 'बकेट लिस्ट' या मराठी सिनेमालाही आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. आजपासून ४ वर्षांपूर्वी म्हणजेच २५ मे २०१८ रोजी त्याने 'बकेट लिस्ट' या सिनेमाची निर्मिती करत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका असेलला 'बकेट लिस्ट' हा तिचा पहिला मराठी सिनेमा होता. माधुरीने 'बकेट लिस्ट' या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तर करणने देखील या सिनेमाच्या माध्यमातून मराठी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यामुळे ४ वर्षांपूर्वी 'बकेट लिस्ट' या सिनेमाची जोरदार चर्चा झाली होती. 'बकेट लिस्ट' या सिनेमामध्ये माधुरी तिच्या मुलीची बकेट लिस्ट कशी पूर्ण करते, याची मनोरंजक आणि वैशिष्ट्यपूर्ण कथा या सिनेमातून दाखवली गेली होती.
करण जोहरने या 'बकेट लिस्ट' सिनेमाची निर्मिती करून त्याच्या मराठी चाहत्यांची इच्छा पूर्ण केली होती. परंतु, या सिनेमानंतर करणने पुन्हा मराठीत फारसे काही प्रोजेक्ट केले नाहीत. पण करणला मराठी सिनेमांची जाण आहे आणि त्याने आणखी काही मराठी सिनेमांची निर्मिती करावी अशी त्याच्या चाहत्यांची नेहमीच अपेक्षा असते. त्यामुळे करण त्याच्या आयुष्याची पन्नाशी साजरी करत असताना त्याने आणखी दर्जेदार आणि उत्तमोत्तम सिनेमांची निर्मिती करावी. अशी त्याच्या चाहत्यांची नक्कीच इच्छा असेल.