प्रिया बापट, सई ताम्हणकर नंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही भूमिकेसाठी वाढवलं वजन!

By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेयर करत 'रानबाजार' मधील रत्ना या भूमिकेसाठी ११ किलो वजन वाढवल्याचं सांगितलं. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात तिने योगसाधना आणि योग्य आहाराने वजन कमी देखील केलं.

प्राजक्ता माळी ही पहिलीच अभिनेत्री नाही जिने भूमिकेसाठी वजन कमी केलंय. याआधी 'वजनदार' सिनेमासाठी सई ताम्हणकरने सुमारे १० किलो, तर प्रिया बापटने तब्बल १६ किलो वजन वाढवले आणि यशस्वीरित्या कमी देखील केले.

तर नुकत्याच आलेल्या 'चंद्रमुखी' या सिनेमातील चंद्रा भूमिकेसाठी अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील ८ किलो वजन वाढवले होते.

या अभिनेत्रींच्या पावलावर पाऊल ठेवत प्राजक्ताने तिच्या 'रानबाजार' मधील 'रत्ना' या भूमिकेसाठी ११ किलो वजन वाढवले होते. आणि आता तिचा वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत आहे. प्राजक्ताचं सध्याचं वजन हे ५४ किलो इतकं आहे. पण एकूण ५१ किलो वजन होण्याचे तिचं उद्दिष्ट आहे आणि ते करण्यासाठी प्राजक्ता कष्ट देखील घेत आहे.

Recommended

Loading...
Share