'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत येणार हा मोठा ट्विस्ट , वाचून तुम्हालाही बसेल धक्का

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु लवकरच या मालिकेला नाट्यमय कलाटणी मिळणार असून प्रेक्षकांना आणि विशेषतः राणादाच्या चाहत्यांना धक्का बसणार आहे. 

'झी मराठी' वाहिनीने नुकतंच आपल्या ट्विटरवर एक नवीन व्हिडिओ पोस्ट करून या व्हिडिओमध्ये राणाला काही लोकं मारताना दिसत आहेत. 

 

राणाला नंदिता वाहिनीचं खरं रुप कळतं. हे समजताच नंदिता राणाला मारण्याचा डाव आखते. त्यानंतर काही गावगुंड राणाला मारताना दिसतात आणि नदीत फेकून देतात. राणादाच्या शोधात निघालेली अंजली हे पाहताच मोठा आक्रोश करताना दिसत आहे. 

यावरून राणादाची मालिकेत एक्झिट होणार का? हे प्रश्नचिन्ह राणादाच्या चाहत्यांना मनात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राणादा एक महिन्यानंतर मालिकेत परतणार असून राणाची ही एक्झिट तात्पुरती असणार आहे. राणा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी वजन कमी करणार असून  राणाचं वेगळं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

त्यामुळे 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आता कोणते वळण घेणार, हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. ही बातमी कळताच 'गुडबाय राणादा' या आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. हा विशेष भाग, २१ जून २०१९ ला सायं ७:३० वाजता प्रेक्षकांना पाहता येईल. 

Recommended

Loading...
Share