या दोघांची लव्हस्टोरी होईल का 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण?', काय आहे ही भानगड

By  
on  

प्रेमकहाणी हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. प्रेमाच्या नवनवीन बाजू दाखवणाऱ्या खूप मालिका आजवर प्रेक्षकांना पाहायला मिळालेल्या आहेत. अशातच 'झी युवा' वाहिनीवर एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून प्रेमाची अनोखी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' असं या नव्या मालिकेचं नाव असून ''#प्रेम करा पण मराठीत'' ही या मालिकेची टॅगलाईन आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

 

या प्रोमोमध्ये लग्नासाठी इच्छुक असलेले मुलगा-मुलगी दिसून येत आहेत. मुलीच्या घरी मराठीचा आग्रह असलेली एक पाटी पाहायला मिळते. त्यामुळे मुलगा तिच्या घरच्यांसमोर तिला लग्नासाठी शुद्ध मराठीत मागणी घालायचा सराव करत आहे. एकूणच या मालिकेतून प्रेक्षकांना एक हटके लव्ह स्टोरी पाहायला मिळणार याची खात्री आहे. 

'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मालिकेतील प्रमुख दोन कलाकार हे नवखे असून एक फ्रेश जोडी या मालिकेतुन झळकणार आहे. १५ जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share