राणाच्या विरहाने अंजली व्याकुळ, नव्या रूपात राणा येणार अंजलीला भेटायला?

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. या मालिकेत राणादाची मालिकेतून एक्झिट झाली आहे. 

त्यामुळे राणादा मालिकेतुन एक्झिट घेणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. परंतु नुकतंच या मालिकेत राजा राजगोंडा नायकाची दमदार एंट्री झाली असून नव्या रुपातला राणादा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

 

परंतु राणादाच्या अचानक जाण्याने अंजली व्याकुळ होऊन राणादाच्या आठवणीत व्याकुळ झाली आहे. अशा परिस्थितीत अंजलीला सावरायला नव्या रुपातला राणा येणार का? आणि या दोघांची भेट होणार का? याची उत्तरं प्रेक्षकांना 'तुझ्यात जीव रंगला'च्या पुढच्या भागात मिळतील. 

राणा आणि राजा या दोघांचा स्वभाव वेगळा आहे. राणा भोळा,  लाजाळू तर राजा डॅशिंग आणि बिनधास्त दिसून येतो. त्यामुळे राजा राणाचं   दुसरं रूप आहे की राजा हा एक वेगळा व्यक्ती आहे? याची सुद्धा प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share