By  
on  

PHOTOS: साहाय्यक दिग्दर्शक ते प्रमुख भुमिका असा आहे अभिनेता सुमित पुसावळेचा प्रवास

सध्या पौराणिक आणि ऐतिहासीक मालिकांनी प्रेक्षकांचं चांगलेच प्रेम मिळवले आहे. यात सध्याच्या घडीला आघाडीवर असणारी मालिका म्हणजे 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं'. या मालिकेत प्रमुख भुमिका करणा-या सुमित पुसावळे ने बाळुमामाच्या मुख्य भुमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकलो आहेत. 

लहानपणापासुन अभिनयाची आवड असणा-या सुमितने शाळा आणि काॅलेजमधुन स्वतःची ही आवड जोपासली. 

मराठी सिनेइंडस्ट्रीत 'सरगम' या मराठी सिनेमातुन सुमितने पदार्पण केलं. त्यानंतर प्रियंका चोप्राच्या प्रोडक्शन कंपनीत मुख्य साहाय्यक दिग्दर्शक म्हणुन सुमितने काहीकाळ काम केलं. 

त्यानंतर 'लागीरं झालं जी' मध्ये सुम्या ही नकारात्मक व्यक्तिरेखा सुमितने साकारली. तसेच 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सुद्धा सुमितने महत्वपुर्ण भुमिका साकारली. 

परंतु 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळुमामाची मुख्य व्यक्तिरेखा साकारुन सुमितला खरी ओळख मिळाली. सुमितने साकारलेल्या या व्यक्तिरेखेचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

अशाप्रकारे साहाय्यक दिग्दर्शक ते अभिनेता असा प्रवास असणा-या सुमितला भविष्यातील वाटचालीसाठी पिपिंगमुन मराठीतर्फे मनःपुर्वक सदिच्छा

Recommended

PeepingMoon Exclusive