कोकणच्या अण्णा नाईकाचो दरारा तुमका आमका सर्वांकाच माहित असा. अण्णा नाईक आणि शेवंताबद्दल तुम्हाला आता काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. त्यांच्या लफड्याची चर्चा सर्वत्रच सुरु असते. मग ते ऑन स्क्रीन असो किंवा ऑफ स्क्रीन गप्पा असोत.
सर्वांची लाडकी मालिका 'रात्रीस खेळ चाले' तील अण्णा नाईक ही व्यक्तिरेखा म्हणजे ह्या मालिकेची जान आहे. अण्णांभोवतीच मालिकेचं कथानक फिरतं. त्यांचा दबदबा, शेवंतासोबततचं त्यांचं नातं व घरातल्या मंडळींप्रती त्यांची असलेली वागणूक यावरुनच ते नेहमी टीकेचे धनी होतात. पण म्हटलं तर हेच त्यांच्या कामाचं खरं यश आहे.
अण्णा नाईक साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर मालिकेत कसे आहेत हे आपल्याला माहितेय पण ख-या आयुष्यात ते कसे आहेत जाणून घेऊया. रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णा नाईक आणि शेवंता ही जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. परंतु तुम्हांला माहिती आहे का, मालिकेत सुंदर अशा शेवंतावर घायाळ होणा-या माधव अभ्यंकर याची खरी पत्नीसुध्दा तिच्या इतकीच सुंदर आहे.
पुरस्काराचं यशसुध्दा माधव अभ्यंकर आपल्या पत्नी रेखा अभ्यंकर यांनाच देतात.
त्यांच्या पत्नीचं नाव रेखा असून त्यांना दोन गोड मुली आहेत. रेखा ह्या सिनेसृष्टीशी संबंधित नसून पती आणि मुलींसोबत त्या वैयक्तिक जीवनात सुखी आहेत. त्यांना आपल्या कुंटुंबियांसोबत वेळ घालवायला आवडतो.
माधव अभ्यंकर ह्यांच्या ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेतील व्यक्तिरेखेमुळे ते अस्सल मालवणीअसल्याचे वाटते पण खरे तर ते मूळचे पुण्याचे आहेत आणि ही भाषा शिकण्यासाठी त्यांनी अनेक मालवणी नाटकांचा अभ्यास केला आहे.
मालिकेत तरुणपणीचा अण्णा नाईक साकारण्यासाठी त्यांनी जवळजवळ ७ ते ८ किलो वजन कमी केले होते. त्यासाठी त्यांनी जवळ जवळ दीड महिने डायटिंग केले होते