जर तुम्हाला तुमच्या अभिनयाचं कौशल्य प्रेक्षकांसमोर सादर करायचं असेल आणि सिनेसृष्टीतील दिग्गज परिक्षकांची वाहवा मिळवायची असेल तर पुन्हा एकदा 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' ह्या कार्यक्रमाचा मंच उपलब्ध होत आहे. झी मराठीवरील 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' ह्या कार्यक्रमाने 10 वर्षांपूर्वी अनेक प्रतिभावान कलाकर दिले. हे कलाकार आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर आज अधिराज्य गाजवत आहेत.
अभिनय क्षेत्रात पाय रोवण्याचं स्वप्नं पाहणा-या महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील तरुणाईसाठी पुन्हा एकदा 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' चा मंच उपलब्ध होत आहे. याच मंचावरुन अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा अभिनेता अभिजीत खांडकेकर या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करताना दिसेल तर 'दुनियादारी', 'खारी बिस्कीट', 'येरे येरे पैसा' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे देणारे सर्वांचे लाडके दिग्दर्शक संजय जाधव या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतील. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा या नवोदित कलाकारांना होईल यात शंकाच नाही.
फक्त स्वप्न पाहू नका कारण आता वेळ आली आहे स्वप्न पूर्ण करण्याची....
महाराष्ट्राचा सुपरस्टार
१५ जानेवारी पासून
बुधवार आणि गुरुवार रात्री ९:३० वाजता.
फक्त @zeemarathi वर@sanjayjadhavv https://t.co/x3SkT3Mpl8— Dreamers PR (@DreamersPR) January 6, 2020
दिग्दर्शक संजय जाधवसुध्दा 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' ह्या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्सुक आहेत. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रत्येक फेरीत पुढे जावं,अशी इच्छा संजय दादांनी एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.