By  
on  

या हिंदी मालिकेत झळकणार हेमांगी कवी, दिसणार आईच्या भूमिकेत

नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये काम करणारी अभिनेत्री हेमांगी कवि आता वेगळ्या रुपात पाहायला मिळेल. विनोदी रिएलिटी शोमधून तिने खळखळून हसवलं तर निवडक मात्र दर्जेदार कामं करताना ती आत्तापर्यंत दिसली. नुकतच पिपींगमून मराठीशी संवाद साधताना हेमांगीने तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी एक्सक्लुझिव्ह माहिती सांगीतली.

लवकरच हेमांगी कवी एका प्रसिद्ध हिंदी वाहिनीच्या मालिकेतून झळकणार आहे. ‘दिल जैसे धडके.. धडकने दो’ असं या हिंदी मालिकेचं नाव आहे. या मालिकेत हेमांगी ही आईच्या भूमिकेत दिसणार आहे. महेश भट यांची संकल्पना असलेली ही मालिका येत्या फेब्रुवारी महिन्यात भेटीला येण्याची शक्यता आहे. मालिकेच्या चित्रीकरणाला मागील वर्षी सुरुवात झाली असून वाराणसी, अलाहाबाद, लोणावळा या ठिकाणी या मालिकेचं चित्रीकरण करण्यात आलय. 

हेमांगी कवी टीक टॉक या प्रसिद्ध एपवरही चांगलीच एक्टिव असते. या एपवरील तिचे व्हिडीओही सध्या चर्चेत असतात. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive