By  
on  

Lockdown: जगभरात नावाजलेली वेब सीरिज ‘हॉस्टेजेस’ आता छोट्या पडद्यावर

लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे नवनवे पर्याय उपलब्ध होत आहेत . जगभरात नावाजलेल्या या वेबसीरिजचीं हॉस्टेजेस ही भारतीय आवृत्ती आहे. हॉटस्टार स्पेशल्सने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. खास बात म्हणजे मराठी प्रेक्षकांना मराठीतून या वेबसीरिजचा आनंद घरबसल्या लुटता येणार आहे. सस्पेन्स थ्रीलर असणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांची उत्कंठा वाढवेल यात शंका नाही.

हॉस्टेजेस ही संपूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे. ही गोष्ट आहे अश्या डॉक्टरची जिच्यावर मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी सोपवण्यात येते. मात्र शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीच त्या डॉक्टरच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. कुटुंबाला वाचवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांचा जीव वाचता कामा नये अशी अट त्या डॉक्टरसमोर ठेवण्यात येते. या द्विधा मनस्थितीत डॉक्टर आपल्या कर्तव्याला जागणार की कुटुंबाचा जीव वाचवणार याची उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे हॉस्टेजेस ही वेबसीरिज.

स्टार प्रवाहवरील मनोरंजनाचा हा खजिना नक्कीच अनुभवायला हवा. त्यासाठी पाहायला विसरु नका हॉस्टेजेस १३ एप्रिलपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive