By  
on  

 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाई साकारणाऱ्या प्राजक्ताला येतेय सेटची आठवण

मनोरंजन विश्वातील कलाकारही शुटींग बंद असल्याने या लॉकडाउनमध्ये घरातच बसले आहेत. मात्र या दरम्यान त्यांना लाईट्स, कॅमेरा, एक्शनची आठवण येत आहे. म्हणून त्यांचे जुने फोटो, सेटवरचे फोटो या निमित्ताने कलाकार पोस्ट करत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला देखील सेटची आठवण येत आहे. 

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबाई यांची भूमिका तिने साकारली. तिने या भूमिकेला न्याय दिल्याने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती प्राजक्ताला मिळाली. आणि या मालिकेच्या सेटवरील काही फोटो प्राजक्ताने या निमित्ताने शेयर केले आहेत. ऑफ कॅमेरा मेकअप करतानाचे हे फोटो आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive