By  
on  

लॉकडाउनमध्ये सुरु होणार ही मराठी मालिका, मालिकेचं नाव असेल 'आठशे खिडक्या नऊशे दारं'

सध्या लॉकडाउनमध्ये सर्व प्रकारचे चित्रीकरण बंद आहे. यातच सगळे कलाकार घरी बसून आहेत. टेलिव्हिजनवर पण जुने एपिसोड आणि जुन्या मालिकांचं पुन्हा प्रसारण सुरु आहे. लॉकडाउन कधी संपणार आणि  चित्रीकरण कधी सुरु होणार याचीच हे कलाकारही वाट पाहत आहे. यात टेलिव्हिजनच्या इतिहासात एक मोठं पाऊल टाकत आहे मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री. 


एक प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या वृतानुसार चक्क लॉकडाउनमध्ये नवी मराठी मालिका भेटीला येणार आहे. या मालिकेतील कलाकार हे आपआपल्या घरातूनच शूट करणार आहे. ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ असं या मालिकेचं नाव असेल. अभिनेता मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत या मालिकेत मुख्य भूमिकेत असतील. शिवाय समीर चौघुले, विशाखा सुभेदार, सखी गोखले, सुव्रत जोशी, आनंद इंगळे हे कलाकारही या मालिकेत झळकतील. श्रीरंग गोडबोले हे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. ही मालिका लॉकडाउन या थिमवरच असेल.  येत्या 18 मे पासून सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive