By  
on  

या मालिकेच्या चित्रीकरणाला झाली सुरुवात, निर्माते महेश कोठारेंनी दिला पहिला क्लॅप

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील चित्रीकरण बंद होते. त्यामुळे टेलिव्हिजनवर जुने भाग आणि जुन्या मालिका पाहायला मिळत होत्या. मात्र आता लवकरच प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांचे नवे भाग पाहायला मिळणार आहेत. कारण सरकारच्या परवानगीनंतर काही मालिकांच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. 

यातच 'प्रेम पॉईझन पंगा' या मराठी मालिकेच्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. यावेळी चित्रीकरणाच्या सेटवर नियमांचं पालन करत आणि सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. या मालिकेचे निर्माते महेश कोठारेही यावेळी उपस्थित होते. मोठ्या कालावधीने चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने महेश कोठारे यांनी पहिला क्लॅप देऊन या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरही चित्रीकरण सुरु झाल्याचा आनंद दिसत होता. 

तेव्हा लवकरच या मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

Recommended

PeepingMoon Exclusive