लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद करण्यात आलं होतं. सर्व प्रकारचे चित्रीकरण बंद असल्यामुळे जवळपास तीन महिने कलाकार घरातच होते. मात्र सरकारच्या परवानगीनंतर आता चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात होत आहे.
‘अग्गंबाई सासूबाई’ या प्रसिध्द मालिकेच्या चित्रीकरणालाही आता नुकतीच सुरुवात झाली आहे. या मालिकेचे कलाकार मोठ्या कालावधीनंतर आता सेटवर पोहोचले आहे. बऱ्याच दिवसांनी चित्रीकरणाला सुरुवात केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. मात्र सेटवर सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करत सुरक्षिततेचीही काळजी घेतली जात आहे. यासाठी सेटवर डॉक्टरही उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतय. मास्क आणि सॅनिटायझराचाही वापर करण्यात येत आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान, निवेदित सराफ, गिरीष ओक, आशुतोष पत्की हे कलाकार सेटवर चित्रीकरणासाठी पोहोचले आहेत. तेव्हा आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही खुशखबर म्हणणं वावगं ठरणार नाही.
सध्या लॉकडाउनमध्ये या मालिकेचे जुने भाग आणि इतर जुन्या मालिका पाहायला मिळत होत्या. मात्र आता ही मालिका आता नव्या भागांसह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येईल.