By  
on  

अखेर महेश भटना पसंत पडला जावई, चाहत्यांना आलिया आणि रणबीरच्या सनई चौघड्यांचे वेध

सध्या लग्नसराईचा सीझन सुरु आहे. अशा वेळी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी लव्हबर्ड्सच्या लग्नाची चर्चा होणं सहाजिक आहे. त्यातही अग्रक्रमाने नाव येतं ते आलिया आणि रणबीरचं. ब्रम्हास्त्र सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या दोघांनी मीडियासमोर नातं स्विकारलं नसलं तरी त्यांच्या नात्याविषयी चाहत्यांना कायमच उत्सुकता राहिली आहे. बरेचदा आलिया देखील रणबीर आणि त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते. त्यामुळे रणबीरच्या घरच्यांनादेखील आलिया विशेष पसंत आहे. आता आलियाचे वडिल महेश भट यांनी देखील आलियाची निवड उत्तम असल्याचं स्पष्ट करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तबच केलं आहे. महेश भट म्हणतात, आलिया आणि रणबीरचं नात लपून राहिलेलं नाही. मलाही रणबीर आवडतो. आता नातं कधी पुढं न्यायचं हे सर्वस्वी दोघांवर अवलंबून आहे. महेशच्या या विधानामुळे रणबीर आलिया लवकरच नात्याला नाव देतील अशी आशा करायला हरकत नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive