By  
on  

बिग बॉस मराठी 2: सातारा बाउन्स चेक प्रकरणात अटक झाल्यानंतर अखेर बिचुकलेंनी मौन सोडलं

बिग बॉसच्या घरातील कायम चर्चेत असणारे स्पर्धक म्हणजे अभिजीत बिचुकले. चेक बाउन्स प्रकरणी सातारा पोलिसांनी त्यांना काल बिग बॉसच्या घरातून अटक केली. याप्रकरणी बिचुकले यांनी मौन सोडून अखेर याप्रकरणासंदर्भात आपलं मत मांडलं. 

बिचुकले याबाबतीत म्हणाले,''माझ्या विरोधात तक्रार करणारे संदीप संपकाळ यांच्या घरी माझं कुटुंब गेली १२ वर्ष भाड्यानं राहात आहे. आम्ही त्यांना नियमितपपणे भाड्याचे पैसे देतो. आमचे कौटुंबिक संबंधही चांगलेआहेत. परंतु अचानक त्यांनी इतकी जुनी केस का उकरून काढली हे मला समजत नाही. तसेच माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करणं हा राजकीय कट आहे. संदीपला माझ्याविरोधात भडकवण्यात आलं आहे. राजकीय स्वार्थासाठी हे केलं जात आहे. मी विधानसभेला उभं राहणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे. मी निवडणूक लढवावी असं न वाटणाऱ्यांनी हे कृत्य केलंय.''

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

बिचुकले यांची वैदयकिय चाचणी,

A post shared by BIG BOSS MARATHI SEASON 2 (@big_boss_marathi_season_2) on

अटक झाल्यानंतर बिचुकलेंच्या छातीत दुखत असल्याने बिचुकलेंना उपचारांसाठी डॉक्टरकडे नेण्यात आलं. बिचुकलेंना आज सातारा कोर्टात हजार करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर बिचुकले पुन्हा बिग बॉसच्या घरात दिसणार का? याबदल मात्र 'कलर्स मराठी'कडून अजून कोणताही खुलासाकरण्यात आलेला नाही. 

Recommended

PeepingMoon Exclusive