By  
on  

बिग बॉस मराठी 2: शिव आणि वीणाची लव्हेबल केमिस्ट्री बहरतेय

 'बिग बॉस' घरातील प्रत्‍येक सरत्‍या दिवसासह शिव आणि वीणा यांची मैत्री अधिकच दृढ होत आहे. बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्‍यामधील प्रेमळ गप्‍पागोष्‍टी अधिकच खुलून आल्या आहेत. 

वीणा आणि पराग 'वीकेण्‍डचा डाव' साठी तयारी करत असताना शिव वीणाला त्‍याचा मेक-अप करण्‍यासाठी मदत मागतो. ती त्‍याला चिडवत म्‍हणते, ''असं डार्क मेकअप करते ना तुझा'' याबाबत शिव निराश होतो आणि म्हणतो, ''कसे लोक आहेत या जमान्‍यात समजतं नाही मला खरंच. भलाई का तो जमाना ही नहीं है आजकल.'' गोंधळलेला शिव त्‍याच्‍या पोशाखाबाबत आणि पेहराव बदलून लाल सूट घालावा का? याबाबत देखील वीणाचे मत घेतो. पण वीणा त्‍याने परिधान केलेला पोशाखच छान असल्‍याचे म्‍हणत बोलते, ''हेच घाल, हे जास्‍त छान वाटतंय.'' 

फक्‍त एवढेच नाही, शिव वीणाला चिडवत म्‍हणतो, '' तू भाव खा फक्‍त, राधा झाली आहे ना?'' याबाबत वीणा प्रत्‍युत्‍तर देते, ''राधा तर मी आहे!'' पुढे म्‍हणते, ''तुला गरज काय मेकअपची, चांगला तर दिसतो.'' तेवढ्यातच वैशाली रूममध्‍ये येते आणि, शिव तिच्याकडे वीणाने केलेल्या मेकअपची मस्‍करीमध्‍ये तक्रार करतो.

या दोघांमधलं हे गोड नातं असंच कायम राहो आणि त्यांच्यातली केमिस्ट्री अशीच बहरत राहो, याची प्रेक्षकांना अपेक्षा आहे. बिग बॉसमधील अशाच कधीही न पाहिलेल्या गोष्टी तुम्हाला VOOT ऍपवर पाहता येतील. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive