By  
on  

श्रध्दा कपूरला झाला डेंग्यू; सायना नेहवाल बयोपिकच्या शूटींगमधून घेणार ब्रेक

सायना नेहवालसारखी हुबेहुब लूकमध्ये दिसलेल्या अभिनेत्री श्रध्दा कपूरचं या भूमिकेसाठी प्रचंड कौतुक झालं. २२ सप्टेंबरपासून या बायोपिकच्या शूटींगला सुरुवात झाली होती. पण आता नुकतंच एक वृत्त हाती आलं आहे, ते म्हणजे श्रध्दा कपूरला डेंग्यू झाल्याचं निदान झालंय.

सायनाच्या बायोपिकच्या शूटींगची सुरुवात तर छान दमदार झाली पण काही दिवसांतच श्रध्दाची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी तिला काही तपासण्या करायला सांगितल्या होत्या आणि त्यात तिला डेंग्यू झाल्याचं कळलं. आता तिने या शूटींगमधून ब्रेक घेतला असून या सिनेमाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते सध्या बालकलाकाराबरोबर शूटींग पूर्ण करत आहे. ही बालकलाकार सायनाच्या बालपणीची भूमिका साकारतेय.

श्रध्दाच्या तब्येतीविषयी बोलताना निर्माते भूषण कुमार म्हणाले, “श्रध्दा सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम करतेय. त्यामुळे तिच्यावर जरा जास्तच ताण येतोय. म्हणूनच तिची तब्येत खालावली. मी तिची परिस्थिती समजू शकतो आणि ती लवकर बरी होऊन शूटींगला सुरुवात करेल अशी आशा करतो.”

https://twitter.com/ShraddhaKapoor/status/1045900838307287042

Recommended

PeepingMoon Exclusive