Exclusive : 'मुलगी झाली हो फेम' योगेश सोहोनी झालेल्या घटनेविषयी म्हणतो "ही घटना रात्री झाली असती तर टाळता आली असती"

By  
on  

'मुलगी झाली हो' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत विविध पात्र साकारणाऱ्या कलाकारांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यामुळे या कलाकारांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. या मालिकेत शौनकची भूमिका साकारणाऱ्या योगेश सोहोनीचाही मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग तयार झालाय. अनेकदा प्रवास करतानाही योगेशला हे चाहते वाटेत भेटतात आणि त्यांना योगेश आवर्जुन सेल्फि, फोटो देतो. मात्र अशात एक वेगळीच घटता योगेशसोबत घडली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करतन असताना एका भामट्याने त्याला हिप्नोटाईज करुन त्याच्याकडून 50 हजार रुपये उकळले. या संदर्भात योगेशने पोलिसात तक्रारही दाखली केली. हे प्रकरण क्राईम ब्रांचच्या हाती गेल्यानंतर या अज्ञात व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. याविषयी  नुकतच पिपींगमून मराठीने योगेशसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. 

ज्या अज्ञात व्यक्तिने योगेशकडून पैसे उकळले त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं योगेशने यावेळी सांगीतलं. ही घटना, त्यानंतर त्या व्यक्तिला झालेली अटक याविषयी योगेश बोलला. 'मुलगी झाली हो' या मालिकेच्या यशाचं श्रेय त्याने प्रेक्षकांना दिलय. याशिवाय त्याच्या करियरमधील यशाचं श्रेय तो त्याच्या आई-वडिलांना देतो. आगामी काळात वेब सिरीजच्या निर्मितीकडे वाटचाल करण्याची तयारी सुरु असल्याचं योगेश या मुलाखतीत म्हटला.

Recommended

Loading...
Share