By miss moon | 21-Jul-2021

पाहा Video : वाढदिवसाला माऊला शौनककडून मिळालं हे खास गिफ्ट

'मुलगी झाली हो' ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसतेय. या मालिकेत विविध पात्र साकारणारे कलाकारही प्रेक्षकांचे आवडते बनलेत. म्हणूनच सोशल मिडीयावरही या कलाकारांना प्रेक्षकांचं प्रेम मिळतय. याच मालिकेत माऊ साकारणारी.....

Read More

By miss moon | 02-Jun-2021

पाहा Video : साखरपुड्याच्या दिवशी शौनकसोबत घडली ही घटना

'मुलगी झाली हो' ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवे ट्विस्टसह ही मालिका वेगळं वळण घेताना दिसतेय. त्यातच शौनक आणि दिव्याचा साखरपुडा या मालिकेत लक्षवेधी ठरणार आहे. या साखरपुडा.....

Read More

By miss moon | 26-May-2021

पाहा Video : 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर राजन मामांकडून शौनक घेतोय गाण्याचे धडे

मुलगी झाली हो ही मालिका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण सुरु आहे. मात्र चित्रीकरणातून मिळालेल्या निवांत वेळेत हे कलाकार विविध गोष्टी करताना दिसत आहेत......

Read More

By Prerana Jangam | 20-May-2021

या अभिनेत्याने लीड भूमिकेसाठी तीन वर्षे वाट पाहिली, 'मुलगी झाली हो' मालिकेत दिसतोय शौनकच्या भूमिकेत

एखाद्या मालिकेत प्रमुख पात्राची भूमिका साकारणं आणि ते मिळणं हे कोणत्याही कलाकारासाठी महत्त्वाचं असतं. मग ती मालिका जर प्रचंड लोकप्रिय होते तर त्याचा फायदा त्या कलाकारांनीही होतो. त्यांचीही लोकप्रियता वाढते......

Read More

By Prerana Jangam | 19-May-2021

Exclusive : 'मुलगी झाली हो फेम' योगेश सोहोनी झालेल्या घटनेविषयी म्हणतो "ही घटना रात्री झाली असती तर टाळता आली असती"

'मुलगी झाली हो' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत विविध पात्र साकारणाऱ्या कलाकारांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यामुळे या कलाकारांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. या.....

Read More

By miss moon | 10-May-2021

पाहा Video : 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर शौनकने अशी बनवली 'रोटी'

'मुलगी झाली हो' या मालिकेला कमी कालावधी चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेच्या विषयाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. इतर मालिकांप्रमाणे कोरोना काळात लॉकडाऊनमुळे या मालिकेचही चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. त्यामुळे.....

Read More

By miss moon | 27-Apr-2021

पाहा Video : 'मुलगी झाली हो'च्या सेटवर चक्क शौनकने केला माऊचा मेकअप

'मुलगी झाली हो' ही मालिका आता वेगळ्या वळणावर प्रेक्षकांचं लक्ष वेधताना दिसतेय. एकीकडे आपल्या मुलीचा द्वेष करणारा विलास पाटील आता मुलीसाठी काहीही करण्यासाठी तयार झालाय. मालिकेतील हे रंजक वळण प्रेक्षकांना.....

Read More

By | 22-Feb-2019

‘ती फुलराणी’ मालिकेत होणार, एका ज्येष्ठ कलाकाराची एंट्री पाहा कोण आहेत हे अभिनेते

श्रीमंत घराणं असलेलं देशमुख कुटुंब कसं आहे, किती भिन्न स्वभावाचे व्यक्ती त्या कुटुंबात राहतात याची कल्पना प्रेक्षकांना आलीच आहे. मंजूच्या बाबतीत देशमुख कुटुंबांनी प्रत्येकवेळी अडचणी उभ्याकेल्या, तिला कमी लेखलं, तिचा अपमान केला याविषयी नाराजी आणि राग मंजूच्या मनात नक्कीच असणार. आता या मालिकेत अशा एका नवीन व्यक्तीची एण्ट्री होणार आहे ज्याला श्रीमंत, भांडवलशाहीवृत्तीच्या माणसांबद्दल अतिशय तिटकारा आहे आणि विशेष करुन देशमुख कुटुंबाबद्दल प्रचंड संतापही आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ‘जगदीश महापात्रे’.

वय सत्तरीच्या आसपास असलेले, रुबाबदार, देखणं व्यक्तीमत्त्व, बुद्धीमान असलेल्या जगदीश महापात्रे ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी साकारली आहे. जगदीश महापात्रे यांनीमानववंशशास्त्रामध्ये पीएचडी केली आहे, माणसांचा, राहणीचा, संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आहे.

 

ते जरी हुशार असले तरी त्यांचा स्वभाव फार विचित्र आहे. कधी काय विचार करतील, काय बोलतीलयाचा नेम नाही. इतकेच नव्हे तर बेधडकपणे बोललो, वागलो तर समोरच्याला काय वाटेल याचा विचारही ते करत नाही. बाहेरुन कितीही कडक वाटले तरी ते मनाने संवेदनशील आहेत. हुशार, स्वतंत्र, स्वाभिमानी माणसांबद्दल त्यांना  आदर आहे. असं असूनही त्यांना लहानपणापासून त्यांच्या आईकडून एकच वाक्य ऐकू आलंय की, देशमुखांमुळे त्यांच्या कुटुंबाचे हाल झाले, त्यामुळे त्यांचा देशमुखकुटुंबावर अजूनही राग आहे. पण देशमुखांशी त्यांचा संबंध काय, त्यांच्यावर काय अन्याय झाला आहे याचा शोध लवकरच शौनक आणि मंजू घेणार आहेत.

.....

Read More

By | 15-Feb-2019

नवरा-बायकोच्या नात्याचं प्रतिक मंगळसूत्र भेट देऊन शौनक सेलिब्रेट करणार लव्हस्टोरी

शिक्षणामुळे जोडली गेलेली ‘ती फुलराणी’ मालिकेतील मंजू आणि शौनकची जोडी एकमेकांच्या सोबतीने त्यांच्यमध्ये निर्माण झालेले नवीन नाते अनुभवत आहेत. एकीकडे त्यांच्या नव्या नात्यात तयारझालेला गोडवा, प्रेमाच्या क्षणांचा आनंद दोघेही घेत आहेत तर दुसरीकडे देशमुख कुटुंबाकडून येणाया अडचणींना सामोरे जाण्यासाठी ते दोघे एकमेकांचा आधारही बनले आहेत.

घरच्यांचा विरोधात जाऊन आणि देवयानीसोबत असलेले नाते तोडून शौनकने मंजूसोबत लग्नाचा ठोस निर्णय घेऊन तो संपूर्ण जबाबदारीने पूर्ण करुन मंजूशी लग्न केल्यामुळे देवयानीच्या मनात राग आणिअस्वस्थता निर्माण झाली आहे. ही अस्वस्थता आणि विश्वासघात झालेल्याची भावना देवयानीला शांत बसू देणार नाही आणि याचाच बदला घेण्यासाठी देवयानी वेगवेगळ्या मार्गाने शौनक-मंजूच्या संसारातलुडबूड करुन मंजूला मानसिक त्रास देण्याच्या विचारात आहे/प्रयत्नात आहे.

सौभाग्यवतींसाठी प्रेमाचे प्रतिक हे मंगळसूत्र असते. मंगळसूत्रामुळे त्यांचे सौंदर्य अजून जास्त खुलून दिसते. पण या दागिन्याचा वापर देवयानी मंजूला त्रास देण्यासाठी कसं करते हे या मालिकेत पाहायलामिळणार आहे. शौनकच्या नावाचं मंगळसूत्र देवयानी घालते आणि नात्याने बायको असलेल्या मंजूला शौनकच्या नावाचं मंगळसूत्र घालायचे आहे पण यात तिचं काही चुकतंय का असा प्रश्न तिच्या मनातउपस्थित झाला आहे. यात मंजूचं काहीही चुकत नसून मंगळसूत्र नवरा-बायकोच्या नात्याचं प्रतिक आहे. प्रेम नसलेल्या नात्यात हे कुरुप दागिन्यासारखं आहे, अशा प्रेमळ शब्दाने तिची समजूत काढूनशौनक मंजूला मंगळसूत्र भेट म्हणून देतो आणि हा क्षण मंजूसाठी आनंदाचा क्षण ठरतो.

या दोघांच्या नात्यात कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांसाठी नेहमी एकत्र येणा-या मंजू आणि शौनकच्या नात्याची लव्हस्टोरीचा एक तासाचा विशेष भाग १६ फेब्रुवारीला नक्की पाहा सोनीमराठीवर.

.....

Read More