By  
on  

पाहा Video : 'जून' सिनेमातील 'बाबा' गाणं बाबांना ऐकवलं तेव्हा ढसाढसा रडली गायिका शाल्मली, पाहा खास मुलाखत

गायिका शाल्मली खोलगडेच्या गोड आवाजाचे असंख्य चाहते आहेत. हिंदीसह मराठीतही आपल्या आवाजाच्या जादून प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी शाल्मलीचा आता नवा प्रवास सुरु झाला आहे. कारण आता म्युझिक कम्पोझर म्हणून शाल्मलीची नवी ओळख निर्माण होतेय ती 'जून' या सिनेमातून. येत्या 30 जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. म्युझिक कम्पोझर म्हणून डेब्यू करणाऱ्या शाल्मलीशी पिपींगमून मराठीने खास बातचीत केली आहे. यावेळी तिने जॉन मेयर आणि मेरिकन गायिका, गीताकर बियॉन्सेचा तिच्यावर असलेला प्रभाव याविषयी शाल्मली बोलली. 

'जून' या सिनेमातील 'बाबा' हे गाणं जेव्हा शाल्मलीने तिच्या वडिलांना ऐकवलं तेव्हा ती स्वत: कशी ढसाढसा रडू लागली या भावुक क्षणाची आठवणही तिने शेयर केली. संगीत क्षेत्रात आणखी विविध गोष्टी शिकण्याची शाल्मलीची इच्छा असल्याचं यावेळी तिने सांगितलं.

Recommended

PeepingMoon Exclusive