पाहा Video : या कारणामुळे अजिंक्य देव यांनी केसांना लावली कात्री, वडिलांमुळे बाजीप्रभूंची भूमिका करण्याचा घेतला निर्णय

By  
on  

'जय भवानी जय शिवाजी' या ऐतिहासिक मालिकेतून अभिनेते अजिंक्य देव बऱ्याच काळानंतर टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करत आहेत. या मालिकेत ते बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेसाठी त्यांनी स्वत:च्या केसांनाही कात्री लावून खरंखुरं टक्कल केलय. या मालिकेच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने अंजिक्य देव यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या मालिकेसाठी होकार देण्याचं महत्त्वाचं कारणं सांगितलं.

ही भूमिका साकारत असल्याचं अजिंक्य यांनी जेव्हा वडील रमेश देव यांना सांगितलं तेव्हा त्यांनी लगेचच ही भूमिका करण्याचा सल्ला त्यांना दिला. शिवाय या भूमिकेसाठी केसांना कात्री लावणं अगदी छोटी गोष्ट असल्याचंही ते अजिंक्य यांना म्हणाले. 

Recommended

Loading...
Share