By  
on  

पाहा Video : "फिटनेसकडे आत्तातरी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे", रिंकूसोबत खास गप्पा

'200 हल्ला हो' या सिनेमातून अभिनेत्री रिंकू राजगुरु एका बिनधास्त मुलीची भूमिका साकारतेय. या सिनेमातील रिंकूच्या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधलय. याशिवाय आगामी काळातही अनेक सिनेमे आणि सिरीजमधून रिंकू विविध भूमिका साकारणारेय. याच निमित्ताने पिपींगमून मराठीने रिंकूसोबत खास बातचीत केलीय. यावेळी रिंकूने ती साकारत असललेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांविषयी सांगितलं.

प्रत्येक प्रोजेक्टमध्ये रिंकू ही एक बिनधास्त मुलगी असलेली पाहायला मिळतेय. अशाप्रकारच्या ताकदीच्या भूमिका करायला रिंकूला आवडत असल्याचं ती सांगते. शिवाय सध्या फिटनेस महत्त्वाचा असल्याने ती फिटनेसकडेही तितकच लक्ष देत असल्याचं सांगतेय. आगामी काळात 'अनकही कहानिया' या सिनेमातूनी ती झळकणार आहे.

तर मराठीत 'आठवा रंग प्रेमाचा', 'छूमंतर' या सिनेमांमधून रिंकू हटके भूमिकेत दिसणार असल्याचं सांगतेय.

Recommended

PeepingMoon Exclusive