By  
on  

पाहा Video : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत झळकणार हे कलाकार, मालिकेच्या सेटवर खास गप्पा

विविध विषयांवर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात आणखी एक मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. ठिपक्यांची रांगोळी असं या मालिकेचं नाव असून एकत्र कुटुंब पद्धती हा विषय या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणारं कानिटकर कुटुंब या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

या मालिकेची मोठी स्टारकास्ट असून अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. अभिनेते शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे हे कलाकार या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. यावेळी पिपीगंमून मराठीने मालिकेच्या सेटवर त्यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी शरद पोंक्षे यांनी ते स्वत: एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढले असल्याचा अनुभव शेयर केला आहे. शिवाय मालिकेविषयी सांगताना ते म्हटले की एखाद्या जेवणाच्या थाळीत विविध पदार्थ असतात तसे विविध जातकुळीचे कलाकार या मालिकेला लाभल्याचं ते सांगतात. येत्या 4 ऑक्टोबर पासून ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive