By  
on  

पाहा Video : आविष्कार दार्वेकरची चाहत्यांना विनंती, म्हटला "स्नेहाला ट्रोल करु नका"

बिग बॉस मराठी .3 च्या घरातून स्पर्धक आविष्कार दार्वेकरचही एलिमिनेश झालं. आविष्कार हा बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी बिग बॉस मराठीच्या घरात राहिला. स्पर्धक स्नेहा वाघचा पूर्वपती असल्याने या दोघांच्या बऱ्याच चर्चा झाल्या. बिग बॉस मराठीच्या घरात दोघांनी कोणाताही वाद न करता हा खेळ खेळला. शिवाय दोघांंचं बोलणही या घरात झालं. मात्र स्नेहासोबत कोणतच नातं नसल्याचं आविष्कारने सांगितलय. पिपींगमून मराठीच्या मुलाखतीत बोलताना यावेळी आविष्कार म्हटला की, "स्नेहासोबत माझं मैत्रीचं किंवा कोणतच नातं नाही". 

याशिवाय आविष्कारच्या फॉलोवर्सनी स्नेहाला सोशल मिडीयावर ट्रोल केलं. यावर आविष्कारने चाहत्यांना हात जोडून विनंती केली आहे. तो म्हटला की, "जिथे मिच तिला रिस्पेक्ट दाखवतोय तर दुसरं कुणीही तिला ट्रोल करायची गरज नाही. हात जोडून मी सगळ्यांना विनंती करीन की मराठीत आपण असं काही करत नाही. आणि असं करुया नकोत."

Recommended

PeepingMoon Exclusive